VIDEO | मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 30 ते 40 मिनिटांत, पाहा कसा असेल हा प्रवास?

साम टीव्ही
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरु करणार आहे
  • पहिल्या टप्प्यात बेलापूर, वाशी, जेएनपीटी आणि मांडवा दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल

मुंबईकरांना लवकरच वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार आहे. कशी आहे मुंबईकरांची ही नवी सवारी? पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट.

मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 30 ते 40 मिनिटात गाठणं आता शक्य होणारए. आणि मुख्य म्हणजे या प्रवासात नेहमीची ट्राफिकची कटकटही नसेल. कारण हा प्रवास आहे, वॉटर टॅक्सीचा. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत वॉटर टॅक्सी येणार आहे. 

 कशी आहे वॉटर टॅक्सी?

  • मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरु करणार आहे
  • पहिल्या टप्प्यात बेलापूर, वाशी, जेएनपीटी आणि मांडवा दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल
  • वॉटर टॅक्सी तुम्हाला 30-40 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचवेल
  • या सेवेसाठी 6 एजन्सींनी तयारी दर्शवली आहे 
  • 2 ऑपरेटर लवकरच सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहेत 
  • ट्राफिकमध्ये तासंतास अडकून राहणाऱ्या मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांनाही आता अर्थातच या वॉटर टॅक्सी प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live