Mumbai Crime News: हत्या करून झाला फरार, नाव बदलून विकत होता मिठाई; तब्बल 20 वर्षानंतर पोलिसांनी केलं अटक

हत्या करून झाला फरार, नाव बदलून विकत होता मिठाई; तब्बल 20 वर्षानंतर पोलिसांनी केलं अटक
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

>> संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईच्या विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेतील फरार आरोपीला सांताक्रूझ पोलीसांनी तब्बल 20 वर्षानंतर अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवत मागील 20 वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलिसांनी बिहार गाठून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी मुंबईच्या ठाणे परिसरात मिठाईच्या दुकानात कामाला असल्याची माहिती मिळताच सांताक्रुझ पोलिसांच्या दुसऱ्या टीमने आरोपीला ठाण्यातून अटक केली. रूपेश राय उर्फ अतुल केडिया (43) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Crime News
Class 10Th Student: नागपूर हादरलं! दहावीत 71 टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल...

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले पश्चिमेकडील हॉटेल नेस्ट मध्ये कापड व्यावसायिक दिपक उर्फ देवा मुन्नावर राठोड (२३ वर्षे) आणि रूपेश राय (42 वर्षे ) हे वीस वर्षांपूर्वी 31 मार्च 2003 रोजी मुक्कामास थांबले. तीन एप्रिलच्या सकाळी हॉटेलच्या सर्विस बॉय ने रूम नंबर 108 चा दरवाजा ठोकला. (Latest Marathi News)

मात्र आतून कसलाच प्रतिसाद आला नाही म्हणून सर्विस बॉय ने मॅनेजरला बोलावून मास्टर की ने रूमचा दरवाजा उघडला. बेडवर एक व्यक्ती चादर घेऊन झोपलेला दिसला. त्यास हलवून उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न उठल्याने त्याच्या अंगावरील चादर काढून पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात बेडवर मृतावस्थतेत आढळून आला. परंतु त्याचेसोबत आलेला त्याचा साथीदार गायब असल्याचे समजताच सर्विस बॉय दिनकर विठ्ठल शेट्टी यांनी सांताक्रुझ पोलीस ठाणेला दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ३०२.२०१ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी तपास पद्धती बिहार झारखंड दिल्ली अशा ठिकाणी पाठवली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल पंधरा वेळा तपास पथक आरोपीचे मूळ गाव असलेल्या बिहार राज्यात पाठवले. मात्र आरोपी कुठेही सापडला नाही. अखेरीस मे महिन्यात आरोपी विषयीची माहिती गुप्त बातमीदाराकडून समजली. यानंतर पोलीस पथक पुन्हा आरोपीच्या गावी बिहार येथे गेले.

Mumbai Crime News
UP News: बलात्कार पीडित मांगलिक आहे की नाही? न्यायालयाने कुंडली तपासण्याचे दिले आदेश; काय आहे प्रकरण?

मात्र याही वेळेस आरोपी तेथे सापडला नाही. पोलिसांनी त्याच ठिकाणी तळ ठोकून गुप्त बातमीदाराकडून आधीची माहिती गोळा करून आरोपी आता नाव बदलून महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात असल्याचे समजले. आरोपीचा फोन नंबर उपलब्ध करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे ठाणे येथील लोकेशन मिळवून सांताक्रुझ पोलिसांच्या दुसऱ्या तपास पथकाने आरोपीला एका मिठाईच्या दुकानातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वीस वर्षांपूर्वी केलेल्या कुणाची कबुली दिली.

20 वर्षे आरोपी कुठे होता?

3 एप्रिल 2003 रोजी आपल्याच मित्राचा खून केल्यानंतर आरोपी रुपेश राय याने मृता जवळील एक लाख तीस हजार रुपयाची रोकड घेऊन पुण्याला पळाला. यानंतर आरोपीने पाच वर्ष झारखंड येथे कोळशाच्या खदानीत काम केले त्यानंतर आरोपी गुजरात गोवा याही ठिकाणी काही वर्ष कामाला होता मागील तीन वर्षापासून तो मुंबई जवळील ठाणे परिसरात मिठाईच्या दुकानात नाव बदलून काम करत होता.

मित्राची हत्या कशासाठी केली?

दिल्ली येथून मुंबईत कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन मित्रांपैकी एकाने आपल्या दुसऱ्या मित्राची हत्या केली. यातील आरोपीचे दिल्लीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल होते. त्याला लवकर दिल्लीला परत जायचे होते. मात्र कापड व्यावसायिक मित्र अजून काही दिवसांनी परत जाऊ असे सांगू लागला. दोघात याच गोष्टीवरून वाद झाला आणि रुपेश ने दीपक उर्फ देवा राठोड याचा बटर क्नाईफ ने मानेवर वार करून खून केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com