VIDEO | मुंबई... आता रात्रीही धावणार... 

वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ही नाईट लाईफ अनुभवण्यासाठी आता उरलेत फक्त काही दिवस... कारण प्रजासत्ताक दिनाचा सूर्य मावळल्यानंतरची रात्र.. मुंबईकरांसाठी एक नवा अनुभव घेऊन येणारए... मुंबईकरांना आता नाईट लाईफची उत्सुकता लागलीए.. या नाईट लाईफमध्ये काय आहे, आणि काय नाही याच्याच चर्चा कट्ट्या कट्ट्यावर रंगल्यात.. 

नरिमन पॉईंट, काळा घोडा आणि बीकेसीतून नाईट लाईफला सुरुवात होतीए... इथली मॉल्स, दुकानं आणि हॉटेल्स 24 तास सुरु राहणारएत... 

पब आणि बार मात्र रात्री दीड वाजताच बंद होतील. नाईट लाईफ अनुभवणाऱ्या मुंबईकरांसाठी पोलिस सज्ज असतीलशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तिसरा डोळाही या नाईट लाईफवर नजर ठेवेलपण या नाईट लाईफवरुन भाजपने सरकारला काही सवाल केलेत... 

आता आदित्य ठाकरेंची ही महत्त्वाकांक्षी योजना... आणि ठाकरे सरकारचा हा निर्णय किती यशस्वी होतो, हे पुढच्या काही दिवसांत, किंबहुना रात्रींत कळेलच... पण फायनली मुंबईकरांच्या नशिबात नाईट लाईफ आलीए... हे ही काही कमी नाहीए... 

WebTittle:: Mumbai ... now night will run ...

संबंधित बातम्या

Saam TV Live