कारमधून एक कोटींची रोकड जप्त, 9 जणांना अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

 

 

 

 

मुंबई: निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने कांदिवली पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यावेळी एका कारमधून मोठी रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रोव्हेल्स मॉलजवळील सर्व्हिस रोडवर टाटा हेक्सा कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी ही रक्कम तब्बल एक कोटी असल्याचे समोर आले. पोलिसांनी अमित सेठ यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे. 

एका कारमधून पोलिसांनी तब्बल एक कोटींची रोकड जप्त केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

 

Web Title mumbai police seized one crore rupees at kandiwali arrest 9 accused


संबंधित बातम्या

Saam TV Live