आज दुपारी एक्स्प्रेस-वे बंद

आज दुपारी एक्स्प्रेस-वे बंद


पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग कळंबोली येथून सायन-पनवेल महामार्गावरून सुरू होतो. महामार्ग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरवर शेडुंग फाटा आहे. शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे काम हाती घेतले आहे. ओव्हरहेड गँन्ट्री प्रकारचे काम असल्यामुळे सूचना फलक लावण्यासाठी वाहने बंद करावी लागणार आहेत. हे काम दोन तासांत पूर्ण करून महामार्ग पुन्हा सुरळीत करण्याचे लक्ष्य रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांनी ठेवले आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते २च्या दरम्यान हे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे या कालावधीत खालापूरपर्यंतचा प्रवास वाहनांना द्रुतगती मार्गावरून करता येणार नाही. त्यामुळे वाहनांनी कळंबोली सर्कल येथून जुना-मुंबई पुणे महामार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कळंबोली सर्कल येथून डी पॉइंटमार्गे पळस्पे फाटा, पनवेलमधून पळस्पे फाटा मार्गावरून जाऊन थेट खालापूर येथे द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. याच कालावधीत मुंबई-पुणे राज्य महामार्गावर एकाच वेळी वाहनांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे अवजड वाहने द्रुतगती मार्गावर 6 किलोमीटरनंतर थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. पुजारी यांनी दिली.


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सूचना फलक लावण्यासाठी शुक्रवारी दुपारी महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी कळंबोली येथून सुरू होणाऱ्या द्रुतगती महामार्गावर न जाता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. 

Web Title :mumbai pune expressway to be shut for two hours today
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com