पुण्यामधील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून, तरुणीकडून १० लाख रुपयेला गंडद्यात घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
पुण्यामधील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या
पुण्यामधील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्याSaam Tv

पुणे : ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून, तरुणीकडून १० लाख रुपयेला गंडद्यात घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात Pune उघडकीस आली आहे. या प्रकरणात ३० वर्षीय तरुणाला पोलिसांनी बारामतीत Baramati बेड्या ठोकल्या आहेत.

सोशल नेटवर्किंग साईटवर social networking site झालेल्या, ओळखी वरून तरुणाने तक्रारदार तरुणीकडून पैसे उकळले आहेत. अमेरिकन American तपास संस्थेचा अधिकारी असल्याची, माहिती देऊन आरोपीने तरुणीला गंड्यात घातलं आहे. ‘रॉ’ या तपास संस्थेची नजर आपल्यावर असल्याची भीती दाखवत, त्यान तरुणीकडून तब्ब्ल १० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणा मधील २८ वर्षीय धनश्री हासे या तरुणीने पोलिस Police ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चतुःशृंगी Chatursrungi पोलिसांनी या तरुणाला बारामतीमध्ये बेड्या ठोकले आहेत. ३० वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यामधील बारामती एमआयडीसी MIDC परिसरात राहत आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवरून आरोपी आणि फिर्यादी तरुणी या दोघांची ओळख झाली. एप्रिल ते ७ जुलै दरम्यान ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवत त्या तरुणीकडून १० लाख रुपये उकळले आहे.

पुण्यामधील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या
मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या तरुणाला जुहू पोलिसांकडून अटक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात चतुःशृंगी पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन, आरोपीला गजाआड केले आहे. पोलीस याचा पुढील तपास करित आहे. दुसरीकडे, सोशल मीडियाद्वारे तरुणींना वेड्यात काढून ओळख वाढवत आहेत.

त्यांना मग लग्नाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या नात्यामधील तरुणांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून लुटायचे, अशाप्रकारे तब्बल ५७ जणींना गंडा घालणाऱ्या, ‘भामट्याला पुण्यामधील बिबवेवाडी Bibwewadi पोलिसांनी अटक केल आहे. त्याने ४ जणींसोबत घरोबा करुन, आर्थिक लूट केल्याचे, तर तब्बल ५३ तरुणींशी लग्नाचे आमिष दाखवून बोलणी केल्याच तपासात उघड झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com