
निवृत्ती बाबर, मुंबई
Mumbai Seat Belt News: दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चारचाकी सहप्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चारचाकी कारमधील सर्वप्रवाशांना आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ सीट बेल्ट (Seat Belt) लावणं बंधनकारक असणार आहे.
कारचालकाने तसेच सहप्रवाशांनी सीट बेल्टशिवाय प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या अंतर्गत 149 (b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या नियमाची अंमलबजावणी आजपासूनच सुरु झाली आहे. मात्र, मुंबई वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) मुंबईकरांना काहीसा दिलासा दिली आहे. आजपासून पुढचे १० दिवस म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. (Mumbai Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार, सीट बेल्ट संदर्भातल्या कारवाईला मुंबई वाहतूक पोलिसांनी १० दिवसांची सूट दिली आहे. या १० दिवसांत वाहतूक पोलिस लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत, तसेच आजपासून सीट बेल्ट वापरण्यासाठी कडक शब्दात समज दिला जाणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलिस ११ तारखेपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात करणार आहेत. चारचाकी गाडीत सर्व प्रवाश्यांनी सीटबेल्ट वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र आता पुढील १० दिवस वाहतूक पोलीस दंड न ठोठावता जनजागृती करणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियम १२५ (१) अन्वये आठ प्रवासी क्षमतेपर्यंत आसन व्यवस्था असलेल्या (Front Facing) सर्व चारचाकी वाहनातील प्रवाशांना सिटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारीत ) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये वाहन चालक व प्रवास करणारे सर्व सह प्रवासी यांनी सिटबेल्टचा वापर न केल्यास वाहन चालकांवर ई-चलान कारवाई करण्याबाबत आदेश झाले आहेत. तसेच दुचाकी चालवणारे चालक व सहप्रवासी (Pillion) यांनी हेल्मेट परिधान न केल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९ अन्वये दंडास पात्र आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.