Breaking News: अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य
Breaking News: अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्यSaam Tv

Breaking News: अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य

राज्यात काही दिवसांपुर्वी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विर्दभात पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला खास ओढून नेला.

मुंबई: राज्यात काही दिवसांपुर्वी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विर्दभात पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला खास ओढून नेला. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर पंचनामे होवून शेतकऱ्यांना मदत कधी होईल अशी चर्चा सुरु होती. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसाहाय्य घोषीत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा केली आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाने घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मतदीत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर त्याचबरोबर बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com