उंदीरच निघाला चोर, तब्बल १० तोळे सोने केले होते लंपास; काय घडलं नेमकं?

पोलिसांनी हरवलेले दागिने महिलेला परत मिळवून दिले आहेत.
Mumbia News
Mumbia NewsSaam Tv

मुंबई: तुम्ही दागिन्यांच्या चोरीच्या घटना ऐकल्या असतील, पण मुंबईत (Mumbai) एक वेगळीच घटना समोर आली आहे. चक्क उंदराने १० तोळे सोने पळवल्याची घटना समोर आली आहे. या दागिण्यांचा माग पोलिसांनी (Police) सीसीटीव्ही फुटेज तपासून लावला आहे. ही घटना मुंबईतील गोकुळधाम कॉलनीमध्ये घडली. येथील गटारातून हे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक महिला आपले दागिने बँकेत गहान ठेवण्यासाठी जात होती. यावेळी त्या महिलेकडे दोन छोट्या पिशव्या होत्या, यावेळी त्या महिलेला रस्त्यात एक मुलगा दिसला. या मुलाने महिलेकडे खाण्यासाठी काहीतरी देण्याची मागणी केली. यावेळी त्या महिलेने चुकून दागिने असणारी पिशवी दिली, या पिशवीत एक वडापावही होता.

Mumbia News
मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात विद्यार्थी आक्रमक; बिहारमध्ये ट्रेन पेटवली

या महिलेच्या काही वेळाने आपले दागिने हरवल्याचे लक्षात आले. यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले, आणि सर्व घटना पोलिसांना (police)सांगितली. पोलिसांनी वेळ न दवडता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, आणि महिलेने ज्या मुलाला दागिन्यांची पिशवी दिली त्याला शोधून काढले.

Mumbia News
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! राज्यात येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

यावेळी त्या मुलाने आपण ती पिशवी कचऱ्यात फेकून दिल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तपासणी केली. यावेळी पोलिसांनी उंदीर पिशवी ओढत नेत असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी पिशवी तपासली तेव्हा पोलिसांना बाजूला असणाऱ्या गटारात १० तोळे सोने सापडले. पोलिसांनी (Police)ती पिशवी संबंधीत महिलेला परत केली आहे. सध्या या घटनेची चर्चा जोरदार सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com