Kalyan News: महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप; वीज चोरीचे तब्बल 105 प्रकरण

Mahavitaran News: टिटवाळ्यात वीज थकबाकीदार ग्राहकांचा प्रताप पाहून महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्याला भलताच ताप झाला आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv

अभिजीत देशमुख

Titwala News: थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन्हा चोरून वीज जोडणी करून वीज वापरणाऱ्या टिटवाळा उपविभागातील 105 जणांविरुद्ध महावितरणकडुन मुरबाड पोलीस ठाण्यात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणच्या कल्याण परिमंडळच्या पथकाने टिटवाळा परिसरात धडक कारवाई करून 54 लाख 56 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली. (Latest Marathi News)

Kalyan News
Maharashtra Politics: पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत; वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर,11 जूनला मतदान

कल्याण (Kalyan) परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या तपासणीत 105 जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिस देण्यात आली.

परंतु विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. (Kalyan News)

Kalyan News
Beed News: परळीत घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, ४ जण गंभीर

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com