Pune Accident News : मुंबई-बंगळुरू महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात, १२ प्रवासी जखमी

पुण्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बावधन जवळ अपघात झाल्याची घटना घडली.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam tv

पुणे : पुण्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बावधन जवळ अपघात झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताने महामार्गावर एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस मुंबई-बंगळुरू महामार्गावरून बंगळुरूच्या दिशेने जात होती. या खासगी बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. याच खासगी बसच्या (Bus) चालकाचं बसवरून नियंत्रण सुटलं.

Pune Accident News
Bangladesh Accident : बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एका छोट्या ब्रिजवरून खाली कोसळली. शनिवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत एकूण १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या बावधनजवळ हा भीषण अपघात (Accident) झाला आहे .

Pune Accident News
Pune Accident: पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात! १५ फूटांवरून कोसळली प्रवाशांनी भरलेली बस

नेमका अपघात कसा झाला?

शर्मा ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने जात होती. या खासगी बस चालकाचं पुण्यातील बावधनजवळी पेट्रोल पंपाजवळ नियंत्रण सुटलं. यामुळे पुलाचे कठडे तोडून रस्त्यावरून खाली कोसळली. शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली.

या खासगी बसमध्ये एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १२ जण जखमी झाले. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com