बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत येणाऱ्या २ दिवसांत संपणार आहे.
बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळ
बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळSaam Tv

मुंबई : महाराष्ट्र Maharashtra राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत येणाऱ्या २ दिवसांत संपणार आहे. परंतु, हे काळ अपुरा असल्यामुळे शिक्षकांना teacher विद्यार्थ्यांचे students गुण भरण्याकरिता ४ दिवसांचा कालावधी वाढवून द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

हे देखील पहा-

राज्य सरकारने State Government शिक्षकांना १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि गुण तक्ते सादरी करणकरिता ७ दिवस तर, वर्ग शिक्षकांना परीक्षण आणि नियमनाकरिता ९ दिवस देण्यात आले होते. याची मुदत संपली असून, आजून काही ठिकाणी हे काम अपूर्ण आहे. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत संपत आली आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली यानंतर बंद होणार असल्याचे, कळवण्यात आले आहे.

बारावीचा निकाल उशीरा लागणार शिक्षकांनी मागितला वेळ
असा पाहा बारावीचा निकाल

परंतु, यादरम्यान संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती देत असताना शिक्षकांनी पावसामुळे Rain वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेटची Internet सुविधा विस्कळित होणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. १२ वीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करत आहेत, पण मुसळधार पावसाने इंटरनेट, वीज खंडित होत आहे. यामुळे सरकारने संगणकीय प्रणाली मध्ये विषय निहाय गुण देण्याकरिता दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी मुंबई Mumbai कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com