पंधरा कोटी खर्चूनही खचला रस्ता! १२ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

१२ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
पंधरा कोटी खर्चूनही खचला रस्ता! १२ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
पंधरा कोटी खर्चूनही खचला रस्ता! १२ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यताSaam Tv

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव Ambegaon तालुक्यामधील माळीण फाटा Malin Phata या ठिकाणी पावसाने Rain रस्ता खूपच खचला आहे. रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले असले तरी, त्यामध्ये साईड पट्टी न भरल्यामुळे रस्त्याच्या बाजूचा भरावा वाहून गेले आहे. हा रस्ता २ ते ३ फुट खाली खचला गेला आहे.

पावसाचा जोर जर आजून वाढला तर रस्ताच वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात बोरघर Borghar आणि आहुपे Ahupe हा ३२ किमी रस्त्याच्या कामाकरिता तब्ब्ल १५ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. हे रस्त्याचे काम मागील ५ महिन्यांपूर्वी करण्यात आले होते.

हे देखील पहा-

परंतु, पहिल्या पावसातच माळीण फाटा या ठिकाणी रस्ता सुमारे २ फुट खाली खचला गेला आहे. बोरघर आणि आहुपे रस्त्याच्या कामाकरिता केंद्रीय मार्ग निधीमधून बोरघर, अडिवरे, माळीण, पंचाळे, कोंढरे, न्हावेड, नानवडे, अघाणे, पिंपरगणे, डोण, तिरपाड आणि आहुपे या गावांना आणि परिसरामधील आदिवासी वाडया- वस्त्यांना रस्त्याकरिता तब्ब्ल १५ कोटी रूपयांच्या निधीची मंजुरी मिळाली होती.

पंधरा कोटी खर्चूनही खचला रस्ता! १२ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
परभणी : पालम तालुक्यात गळाटी, लेंडीसह सर्वच नद्यांना पूर; 12 गावांचा संपर्क तुटला

या निधीमधून बोरघर आणि आहुपे या ३२ कि.मी. रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, या रस्त्याच्या कडेचे गटर आणि साइड पट्टयाचे काम करताना काही अडचणी येत असल्यामुळे संबंधित काम राहिले आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. परत माळीणची पुनरावृत्ती होती की काय, अशी भीती स्थानिक नागरिकांच्या मनात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com