अल्पवयीन मुलीवर मारहाण करून बलात्कार; आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक

उल्हासनगर स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार
अल्पवयीन मुलीवर मारहाण करून बलात्कार; आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक
अल्पवयीन मुलीवर मारहाण करून बलात्कार; आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटकSaam Tv

कल्याण : बईत साकिनाका बलात्कार Sakinaka rape case आणि हत्या प्रकरण ताजे असताना उल्हासनगर मध्ये Ulhasnagar एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिर्डीला आईला भेटून परतणाऱ्या अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर धाक हातोड्याचा दाखवत तिच्यावर रेल्वे स्थानक लगत असलेल्या निर्जनस्थळी नेहून बलात्कार केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीकांत गायकवाड असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पिडीत अल्पवयीन तरुणी उल्हासनगर परिसरात आपल्या आजी समवेत राहत होती. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती बसने कल्याणपर्यत आली. \

हे देखील पहा-

कल्याणातून ती लोकलने उल्हासनगर स्थानकात पोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटल्याने ती त्यांच्यासमवेत बोलत उभी होती. याच दरम्यान श्रीकांत गायकवाड या माथेफिरू तरुण तिथे आला, त्याने हातातील हातोडीने तिच्या मित्राना धाक दाखवत पळवून लावले. यानंतर या तरुणीला धाक दाखवत जबरदस्तीने स्थानकाच्या बाजूला असलेल्या पडक्या वसाहतीच्या जवळ पीडित अल्पवयीन तरुणीने विरोध केल्याने तिला मारहाण करत तिच्यावर अमानुष बलात्कार केला आहे.

अल्पवयीन मुलीवर मारहाण करून बलात्कार; आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक
Breaking : धक्कादायक ! निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून एका महिला शिक्षिकेवर बलात्कार (पहा VIDEO)

यानंतर तो घटना स्थळावरून पळता वाट काढला आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दुपारी श्रीकांत गायकवाड या नराधामला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. नराधम गायकवाड यावर आधीही सात ते आठ गुन्हे दाखल आहेत.अशी माहिती रेल्वे पोलीस वाल्मिक शार्दूल यांनी दिली आहे. मात्र या घटनेवर पोलीस बाईट देण्यास नकार देत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com