Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)

पुण्यात कबड्डी पट्टू तरुणीचा एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करत तीन नराधमांनी खून केल्याची घटना बिबेवाडीचा यश लॉन्स वरती घडली आहे.
Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)
Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)सागर आव्हाड

सागर आव्हाड

पुणे : बिबवेवाडी कबड्डीपट्टू हत्या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावला असून, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश भागवत याला आज पहाटे पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळाशेजारच्या असलेल्या झुडपात मुख्य आरोपी हा रात्रभर लपून बसला होता. पुणे पोलिसांची शोधमोहीम सुरु असताना ऋषिकेश भागवत हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता यांनी घटना स्थळाची पाहणी करून गुन्ह्याची सर्व माहिती घेतली आहे.

पहा व्हिडिओ-

पुण्यात कबड्डी पट्टू तरुणीचा एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करत तीन नराधमांनी खून केल्याची घटना बिबेवाडीचा यश लॉन्स वरती घडली आहे. आज सायंकाळी कबड्डी खेळण्यासाठी गेलेल्या क्षितिजा अनंत व्यवहारे या 14 वर्षीय मुलीचा तिघांनी कोयत्याने गळा चिरत खून केला आहे. पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तरुणीच्या खूना प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी रवाना झालेले आहेत.

Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)
पुण्यात खळबळ! एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीचा खून

क्षितीजी आज सायंकाळी मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला बोलावले व तिच्याशी बोलायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद सुरु झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने खून केल्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून तेथून पळ काढला. दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु वार करत असताना त्याला ते काढता आले नाही.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.