Pune : बहिणीची छेड काढल्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या

बहिणीची छेड काढल्याच्या रागात सोळा वर्षीय मुलांचे अपहरण
Pune : बहिणीची छेड काढल्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या
Pune : बहिणीची छेड काढल्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या Saam Tv

पुणे : बहिणीची छेड काढल्याच्या रागात सोळा वर्षीय मुलांचे अपहरण Kidnapping करून हत्या Murder करण्यात आली आहे. भावासह ७ जणांचा यामध्ये समावेश आहे. पुण्यातील Pune चाकणमध्ये Chakan हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रोहित साहनी असे मयत मुलाचे नाव आहे. ६ सप्टेंबर दिवशी अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले.

हे देखील पहा-

रोहित हा एका हॉटेलसमोर बसला होता. मन्सूरने तिथून रोहितच्या दुचाकीवरून अपहरण करण्यात आले आहे. चाकण मार्केट यार्डच्या समोर मोकळ्या मैदानात त्याला आणले होते. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून, रोहितला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.

Pune : बहिणीची छेड काढल्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या
धक्कादायक- तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न

तर अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला आहे. यात रोहितची हत्या झाली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूरला अटक करण्यात आली आहे. पण अराफत आणि त्याच्या आणखी ५ मित्रांचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com