Mumbai ; गेमच्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
Mumbai ; गेमच्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्याSaam Tv

Mumbai ; गेमच्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

मुंबई मध्ये एका 16 वर्षीय मुलीनं भावाबरोबर झालेल्या क्षुल्लक वादावर धक्कादायक पाऊल उचले

मुंबई : मुंबई मध्ये एका 16 वर्षीय मुलीनं 16 years girl भावाबरोबर झालेल्या क्षुल्लक वादावर धक्कादायक पाऊल उचलले आहे. तिने थेट आपले जीवन संपवले आहे. कारण ऐकून तुम्हाला देखील चांगलाच धक्का बसणार आहे. 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला आहे. त्यानंतर तिने त्या रागात उंदीर मारण्याचे Rat Poison औषध पिऊन आत्महत्या Suicide केली आहे.

हे देखील पहा-

शुक्रवारी रात्री मृत मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलच्या गेम खेळण्यावरुन चांगलाच वाद पेटला. त्यांच्याकडे एकच मोबाईल होता. भावाने मोबाईल न दिल्याचा राग मुलीला अनावर झाले. यानंतर तिने रागात उंदीर मारण्याचे औषध पिले आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

Mumbai ; गेमच्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
Monsoon : पुढील चार दिवसात या राज्यांत मुसळधार पाऊस

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली आहे. मृत मुलीचा तिच्या लहान भावाबरोबर मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. या रागात मुलीने जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचे औषध आणले होते.

रागीट स्वभावाच्या असलेल्या या मुलीने ते औषध आपल्या लहान भावासमोरचं प्यायली आहे. तिने हा औषध पिताच भावाने आपल्या आई- वडिलांना ही गोष्ट लगेच सांगितली. यानंतर मुलीच्या आई- वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती समता नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com