मुंबई हादरलं! 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, 2 आरोपींना अटक, 2 फरार

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरवात केल्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी उत्तरप्रदेशला जाण्याच्या प्रयत्नात असताना दोघांना सापळा रचून डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले असून तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

मुंबई - शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी (Police) 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर फरार 2 आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Latest Mumbai Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, पीडित मुलगी पहाटे साडेचारच्या सुमारास केटरिंगचे काम करून आपल्या घरी परतत असताना शिवाजी नगर जुन्या बस डेपोजवळ मुलगी घरी जात असताना, हे चार आरोपी तेथे होते. निर्जनस्थळ असल्याने यातील एका आरोपीने मुलीची वाट अडवून "तू आता कुठून येत आहेस?" अशी विचारणा केली.

हे देखील पहा -

मुलीन कॅटरिंगचे काम करून घरी जात असल्याचे सांगितल्यानंतर एक आरोपी बोलायचे आहे असे सांगून मुलीला आडोशाला असलेल्या एका झोपडीत घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ इतरही आरोपी त्या ठिकाणी आले. त्यानंतर आरोपींनी आळीपाळी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. मुलीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता. एका आरोपीने तिचे तोंड दाबून धरले होते.

Mumbai News
धक्कदायक! आई आणि मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अत्याचारकरून आरोपींनी पळ काढल्यानंतर पीडित मुलीन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरवात केल्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी उत्तरप्रदेशला जाण्याच्या प्रयत्नात असताना दोघांना सापळा रचून डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले असून तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com