Navi Mumbai : नवी मुंबईत शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; २ माजी नगरसेवकांसह ६ तालुकाध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश

Navi Mumbai Politics: नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करुन नागरिकांना न्याय देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Navi Mumbai Politics
Navi Mumbai Politicsसुरज सावंत

मुंबई: नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे. (Navi Mumbai Latest News)

Navi Mumbai Politics
Heavy Rain: मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस; जलमय रस्त्यामुळे काही ठिकाणी वाहतुक कोंडी

याशिवाय सामजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सरिता कांबळे, माजी शिक्षण मंडळ समिती सदस्य अजित सावंत, जिल्हा सरचिटणीस दिलीप सिंह, सामजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, शिवाजी गावडे, उपशहर अध्यक्ष राज नायर यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आपला पाठींबा जाहिर केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई शहर हे अतिशय सुंदर आणि सुनियोजित शहर आहे. मात्र तरीही या शहरात अनेक नागरी आणि पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत, मी स्वतः नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. यापुढेही नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करुन नागरिकांना न्याय देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Navi Mumbai Politics
Nashik Heavy Rain: नाशकात पावसाची जोरदार बॅटींग; गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com