
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन (corona new patients) रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा १९५८२ वर पोहोचला आहे.
मुंबई महापालिकेने आज, शनिवारी कोरोनासंदर्भातील दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे २०५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या १०, ९२, ५५७ इतकी झाली आहे. तर सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांची संख्या ही १३६१३ इतकी झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन अहवाल
गेल्या २४ तासांत २०५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले
याच कालावधीत १७४३ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
कोरोनातून आतापर्यंत १० लाख ५९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १३६१३ वर पोहोचली आहे.
रुग्ण दुपटीचे प्रमाण ३८९ दिवसांवर आला आहे.
Edited By - Nandkumar joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.