मुंबईची चिंता वाढली! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबईमध्ये नव्या कोरोना रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे.
मुंबईची चिंता वाढली! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
Corona Latest News UpdateSaam Tv

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना विषाणूचा (corona) संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत होती. परंतु, मुंबईमध्ये आज नव्या कोरोना रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात २१८ नवे कोरोन रुग्ण (corona new patients) आढळल्याने नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या २०० च्या खाली होती. मात्र, आज नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) वाढत असल्याचं चित्र निर्माण आहे. दरम्यान, आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९,५६६ वर स्थिरावली आहे.

Corona Latest News Update
जग मंदीच्या लाटेवर, पण भारत सर्वात 'बेस्ट'; IMF म्हणतेय, टेन्शन घेऊ नका!

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज मंगळवारी नव्या २१८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १,०६३,२७६ पोहोचली आहे. दरम्यान, आज २०१ रुग्ण हे लक्षणविरहीत आढळले आहेत. तर आज एकूण १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसंच मुंबईतील १५८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,०४२,२८० एवढी झाली आहे. मुंबईतली बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा दर ३९१४ दिवसांवर गेला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com