
मुंबई: मुंबईच्या साकीनाका (Sakinaka) परिसरात २२ वर्षीय विवाहितेच्या हत्येने (Murder) खळबळ उडाली आहे. साकीनाक्याच्या पिंपरीवाडी, बारदान गल्ली परिसरात ही घटना घडली आहे. रिमा प्रजापती असे या मृत महिलेचे नाव आहे. पती वारंवार चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत असल्याने पतीसोबत वारंवार तिचे वाद होत होते. त्यामुळे रोजच्या भांडणाला कंटाळूनच रिमा ही पत्नीपासून वेगळी रहात होती. या दरम्यानही रिमाचा पती तिला त्रास देत बघून घेण्याची धमकी देत असल्याने मानसिक तणावातून तिने नोकरीही सोडली होती. (Murder of 22-year-old married woman in Sakinaka, Mumbai; Suspicion on the husband)
दरम्यान नेहमीप्रमाणे रोहित रविदास हा रिमाला चहा नाष्टा घेऊन गेला असता रिमा रक्ताच्या थारोळ्यात (Murder) पडलेली पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्याने तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. मात्र रिमा प्रजापती हिचे आपल्या पतीसोबतचे वाद पाहता रिमाच्या हत्येचा पहिला संशय हा तिच्या पतीवरच येतो. मात्र, अजूनही ही हत्या नक्की कुणी केली हे तपासाअंतीच कळेल. साकीनाका पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.