मुंबईत कोरोनाचा विळखा घट्टच, आजच्या आकडेवारीमुळं नागरिकांना दिलासा नाहीच

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
Mumbai corona update
Mumbai corona updateSaam Tv

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत (corona new patients) मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.

Mumbai corona update
राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईतील नव्या कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या नव्या २२५५ रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा १,०९०,५०३ वर पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मु्ंबईत आज दिवसभरात कोरोनाचे २२५५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत आज दोन रुग्णांचा मृत्यू (corona death) झाल्याने कोराना मृतांची संख्या १९,५८० वर पोहोचली आहे. तसेच आज कोरोनाचे नवे ११० रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Mumbai corona update
अदानींच्या वाहनाचे सारथ्य; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तर चर्चा होऊद्यात!

मुंबईत १३,३०४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आज १,९५४ रुग्णांना डिस्चार्ज दिला असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १,०५७,६१९ वर गेली आहे त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के एवढा झाला आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा दर ३९९ दिवसांवर पोहोचला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com