Pimpri-Chinchwad Crime News: खिशातून मोबाइल काढल्याने मित्र भडकला; २४ वर्षीय तरुणाने दगडाने ठेचून केली मित्राची हत्या

मद्य पिताना खिशातून मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pimpri-Chinchwad crime News
Pimpri-Chinchwad crime NewsSaam Tv

Pimpri-Chinchwad crime News: पिंपरी-चिंचवडमधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय तरुणाला मित्रासोबत मद्य पार्टी करणं चांगलंच महागात पडलं आहे. मद्य पिताना खिशातून मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेत ३२ वर्षीय नारायण वसंत वाघमारे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र अमर उर्फ एक्या गौतम कसबे या २४ वर्षाच्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी नारायण वसंत वाघमारे याच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Pimpri-Chinchwad crime News
Pune Crime News: विवाहितेचा शारीरिक अन् मानसिक छळ करून ट्रिपल तलाक; पतीला अटक

नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन मित्र मद्य पार्टी करत बसले होते. नारायण वसंत वाघमारे आणि अमर गौतम कसबे असे दोघांची नावे आहेत. हे दोघे शुक्रवारी दुपारी दोन वाजता दरम्यान इंद्रायणी नगर भागातील यशवंत चौक या ठिकाणी मद्य पार्टी करत बसले होते.

Pimpri-Chinchwad crime News
Satara Crime News: धक्कादायक! डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

मद्य पार्टी करताना नारायण वाघमारे याने अमर गौतम कसबे याच्या खिशातील मोबाईल मस्करीत काढला. त्यामुळे संतापलेल्या अमर गौतम कसबे याने नारायण वसंत वाघमारे याच्या डोक्याला दगडाने ठेचून गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान नारायण वसंत वाघमारे यांचा एका खाजगी रुग्णालयात आज मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहे.

दरम्यान, नारायण वसंत वाघमारे यांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ३२ वर्षीय नारायणच्या मृत्यूने त्याच्य कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com