Mumbai मध्ये जळीतकांड, पार्किंगमधील 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या... (पहा व्हिडिओ)

जळीतकांडाने मुंबईत मोठी खळबळ उडाली
Mumbai मध्ये जळीतकांड, पार्किंगमधील 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या... (पहा व्हिडिओ)
Mumbai मध्ये जळीतकांड, पार्किंगमधील 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या... (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई : जळीतकांडाने मुंबई Mumbai मोठी खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास २५ ते ३० दुचाकींनी अचानक पेट घेतला होता. मुंबई मधील कुर्ला पूर्व Kurla east परिसरात रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या इमारतीखाली उभ्या असलेल्या या दुचाकींना आग bikes set on fire लागली होती. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, आगीचे लोट हे इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचत होते.

गाड्यांनी पेट घेतल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे व्हिडीओ बघून आग किती भीषण होती, याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या आगीत सर्वच्या सर्व दुचाकी या संपूर्ण जळुन खाक झाले आहेत.

हे देखील पहा-

सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. ही आग कुणी लावली की लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. जळत्या सिगारेटचे थोटुक फेकल्याने भाग भडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मे २०१९ मध्ये दादर या ठिकाणी असलेल्या शिवाजी पार्क परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ५ दुचाकी मध्यरात्री १च्या सुमारास जळून खाक झाले होते.

Mumbai मध्ये जळीतकांड, पार्किंगमधील 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या... (पहा व्हिडिओ)
सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढ

या घटनेनं परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी ही आग विझवली होती, त्यांनी याबाबत संताप व्यक्त केले होते. विशेष म्हणजे या अगोदर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी २ दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. घटनेबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com