Video : मुंबईच्या 'या' भागात ३ दिवसीय कोळी Sea-Food फेस्टिवलला सुरुवात; मुंबईकरांना ताज्या माशांची मेजवानी

विकेंडला तीन दिवस चालणाऱ्या या फूड फेस्टिवलचे उद्घाटन शिक्षण महर्षी अजय कौल सर यांच्या हस्ते करण्यात आले.
versova festival
versova festival Saam tv

संजय गदडे

Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात कोळी सी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. वीकेंडला तीन दिवस चालणाऱ्या या फूड फेस्टिवलचे उद्घाटन शिक्षण महर्षी अजय कौल सर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात खाद्य प्रेमींसाठी ताज्या-ताज्या मासळींचा आस्वाद घेता येणार आहे. (Latest Marathi News)

versova festival
Andheri By-election: अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद, सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 28.77 टक्के मतदान

या महोत्सवात खाद्य प्रेमींसाठी ताज्या ताज्या मासळी सोबतच कर्ण मधूर कोळीगीतांचा आस्वाद देखील घेता येणार आहे.हा कोळी फूड फेस्टिवल 20 जानेवारी ते 22 जानेवारी असा तीन दिवस चालणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या कोळी सी फूड (Food) फेस्टिव्हलमध्ये खास कोळी मसाल्यांमध्ये बनवलेल्या पदार्थांचे खवय्यांना स्वाद घेता येणार आहे. सोबतच दुसरीकडे कोळी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम देखील अनुभवता येणार आहेत. कोळी महिलांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि कोळी संस्कृतीचं दर्शन घडावं म्हणून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आहे.

Sea-Food Festival
Sea-Food Festival Saam tv
versova festival
Uddhav Thackeray Vs Bawankule: 'उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले'

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा व्हिलेज येथील गणेश मंदिराजवळ 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत या महोत्सवात मासे (Fish), खेकडे, कोळंबी, सुकट आणि त्यासोबत भाकरी.. गरमा-गरम तांदळाची भाकरी आणि सर्व प्रकारच्या माशांचे आणि खेकड्याचे कालवण, तंदूर, तळलेले पॉपलेट, बांगडा यासारख्या पदार्थांवर ताव मारता येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com