Kalyan Trailer Hits Auto Rickshaws : कल्याणच्या पत्री पुलावर विचित्र अपघात, ट्रेलरने दोन रिक्षांना दिली धडक; तिघे जखमी

Kalyan Accident News: या अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
Kalyan Accident
Kalyan Accident Saam Tv

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याणमध्ये भीषण अपघाताची (Kalyan Accident) घडना घडली आहे. बिघाड झालेल्या ट्रेलरने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Kalyan Accident
Ballia Boat Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; गंगा नदीत 40 जणांनी भरलेली बोट उलटली, 4 जणांना जलसमाधी

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कल्याणच्या पत्री पुलावर (Patri Pool) हा अपघात झाला. एका ट्रेलरमध्ये अचानक बिघाड झाला. बिघाड झालेला ट्रेलरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षामधील तीन प्रवासी जखमी झालेत. या जखमी प्रवाशांवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

हा ट्रेलर दुर्गाडीवरुन पत्री पूलाच्या दिशेने येत होता. यादरम्यान पत्रिपुलाजवळ टेलरमध्ये अचानक बिघाड झाला. टेलर चालकाने यूटर्न घेत असताना त्याने समोरुन येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेमध्ये रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, बुलडाण्यामध्ये सोमवारी अपघाताची मोठी घटना घडली. विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला आहे. शेगावला परत येत असताना या वाहनाला अपघात झाला. या अपघातामध्ये 3 भाविकांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com