पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या हि बजावणार चोख बंदोबस्त
Pune Police
Pune PoliceSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे (Corona) तब्बल २ वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala)

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २२ जून रोजी पुणे (Pune) शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून या पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे खास नियोजन करण्यात आलं असून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून २० जून ला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून २१ जून रोजी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत.

हे देखील पाहा -

दरम्यान, २२ जून रोजी सायंकाळी या दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन होणार आहे तर २३ जून रोजी पालखीचा शहरात मुक्कामी असणार आहे. यासाठी आता पुणे पोलिसांकडून (Pune Police) पालखी सोहळ्याकरीता ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासठी विशेष शाखेकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तात राहणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे ६०० जवानांबरोबरच स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील बंदोबस्तात सहभागी असणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com