४८ चैन स्नॅचिंग्स्, ३ राज्यातील वॉन्टेड चोराला टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथे मोठ्या शिताफीने आरोपीला तब्यात घेत जेरबंद केले.
४८ चैन स्नॅचिंग्स्, ३ राज्यातील वॉन्टेड चोराला टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
४८ चैन स्नॅचिंग्स्, ३ राज्यातील वॉन्टेड चोराला टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!Saam TV

कल्याण: गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत चैन स्नॅचिंगचे ४८ गुन्हे दाखल असलेल्या नामचीन चोरट्यास (chain snatcher) टिटवाळा (Titwala) पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथे मोठ्या शिताफीने जेरबंद करीत बेड्या ठोकत (Arrestrd) ताब्यात घेतल्याने अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (48 chain snatchings, wanted thief in 3 states handcuffed by Titwala police!)

हे देखील पहा -

गौरेश रोहिदास केरकर उर्फ गावडे (वय ३५) असे चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याचे नाव असून तो नॉर्थ गोवा पणजी येथे राहत आहे. त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तेरा वर्षांपासून विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातील पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र राहण्याची जागा गुन्हा केल्यानंतर सतत बदलत असल्याने तो पोलिसांच्या हातावर तुरी देत चकमा देत होता. गोवा राज्यात पणजी, म्हापुसा, कलंगुट, परवरी, बिलोचीम, परनेम, पोंडा, लांजा याठिकाणी त्याच्यावर चैन स्नॅचिंग चे २५ गुन्हे दाखल असून कर्नाटक राज्यात हुबळी व धारवड तसेच महाराष्ट्रातील ठाणे येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कल्याणातील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, खडकपाडा पोलीस स्टेशन, उल्हासनगर पोलीस स्टेशन तसेच टिटवाळा परिसरात चैन स्नॅचिंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी अनेकदा सापळे व पाळत ठेवून चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून जाण्यास यशस्वी होत होता. काल टिटवाळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिसांना मुंबईतील कामाठीपुरा परिसरात रोहिदास केरकर असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने त्याला सापळा लावीत ताब्यात घेतले. तीन राज्यातील पोलिसांना सतत गुंगारा देऊन चैन स्नॅचिंगचे प्रकार तो करत होता.

४८ चैन स्नॅचिंग्स्, ३ राज्यातील वॉन्टेड चोराला टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
महाराष्ट्र विधीमंडळ समिती जालना दौऱ्यावर; विकास कामांची प्रत्यक्ष करणार पाहणी...

काल अखेर टिटवाळा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे, पोलीस हवालदार तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी ४८ गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात यश संपादन केले आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्मिता पाटील, उपाधिक्षक नाईक यांनी टिटवाळा पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com