महाराष्ट्रात माणुसकी 'सुन्न'; पालघरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रात माणुसकी 'सुन्न'; पालघरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
महाराष्ट्रात माणुसकी 'सुन्न'; पालघरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कारSaam Tv

पालघर : राज्यात सध्या दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच, पालघर मधील बोईसर या ठिकाणी एका ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोईसर परिसरातील एका ५ वर्षीय चिमुकलीवर १२ वर्षीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

हे देखील पहा-

पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर बोइसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर पीडित चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com