Coronavirus Update : ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, महापालिका सतर्क

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा.
Coronavirus Update, Thane
Coronavirus Update, ThaneSaam TV

Thane Covid-19 News : गेली दोन वर्षे कोरोनाने (coronavirus) सर्वांनाच हैराण केले होते. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सर्व सुरळीत असतानाच पुन्हा या संसर्गाने डाेकं वर काढले आहे. देशात काेविड रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाण्यात आठवड्यात ५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Maharashtra News)

Coronavirus Update, Thane
Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठीच्या उपाेषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

ठाणे येथे काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने ठाणे महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाला खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना चाचणीची संख्या आजपासूनच (शनिवार) वाढविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus Update, Thane
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक गटास माेठा धक्का, 'राजाराम' चे 1272 सभासद अपात्र; सतेज पाटील कारखाना ताब्यात घेणार?

दरम्यान नागरिकांनी वर्दळीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे. स्वच्छतेच्याबाबतीत देखील ठाणे महापालिका काळजी घेत आहे असेही महापालिकेने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com