Fraud News : बापरे! बनावट कागदपत्रे सादर करून बँकेला ६ कोटी ३० लाखांना फसवलं

गृहकर्ज काढण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करत बँकेची तब्बल ६ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Kalyan Bank Fraud
Kalyan Bank Fraudsaam tv

डोंबिवली: कल्याणमध्ये (Kalyan) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमधील कॉसमॉस बँकेच्या शाखेत गृहकर्ज काढण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून दोन खासगी कंपन्या, २६ कर्जदार आणि विकसकाने बँकेची (Bank) तब्बल ६ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. कल्याणमधील कॉसमॉस बँकेला कोरवी अॅग्रो कंपनीचे संचालक कोकरे आणि क्रक्स रीक्स मॅनेजमेंट या कंपनीचे संचालक, २६ कर्जदार, श्री सिध्दीविनायक डेव्हलपर्स, श्री साईराज बिल्डर, साई सृष्टी बिल्डर, संस्कृती बिल्डर्स, आणि कर्ज मंजुरीतील मध्यस्थ उमेश भाईप यांनी संगमनत करुन कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.

पाहा व्हिडीओ -

हा सर्व प्रकार बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद बेदाडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भातील तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तो सोपवण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com