रायगड जिल्हा कारागृहातील 69 कैद्यांना कोरोनाची लागण

अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह अद्याप दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत.
रायगड जिल्हा कारागृहातील 69 कैद्यांना कोरोनाची लागण
रायगड जिल्हा कारागृहातील 69 कैद्यांना कोरोनाची लागण राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड: अलिबाग तालुक्यात कोरोनाचा (Coronavirus) विळखा अद्यापही घट्ट असून ग्रामीण भागात प्रादुर्भाव जास्त आहे. पण आता कोरोनाने अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिरकाव केला आहे. कारागृहातील ६९ कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. सर्व कैद्यांवर नेहुली येथील कोव्हीड सेंटर मध्ये हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह अद्याप दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत. १ हजार २१२ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. यात सोमवारी आणखी १०१ जणांची भर पडली आहे. चिंताजनक बाब म्हणजे यात जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ६९ जणांचा समावेश आहे. रविवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची करोना चाचणी करण्यात आली होती ती या चाचणीत ६९ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा कारागृहातील कोरोना बाधित ६९ जणांना अलिबाग नेहुली येथील कोव्हीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बहुतांश रुग्णांना कोरोनाची कुठलिही लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत उपचार सुरु करण्यात आले आहेत. अशी माहिती अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली. कैद्याबरोबरच कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचे या आरोग्य तपासणीत समोर आले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com