Pune News : राजगुरुनगरातील शाळेत विषबाधेची घटना, 80 विद्यार्थी रुग्णालयात दाखल; मुलींची संख्या अधिक

RajguruNagar News: या घटनेमुळे पालक वर्ग धास्तावला आहे.
Mid day meal, Rajgurunagar
Mid day meal, Rajgurunagarsaam tv

Pune News : राजगुरुनगर (Rajgurunagar) शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील (hutatma rajguru vidyalaya) 80 मुलांना विषबाधा झालेली आहे. शालेय पोषण आहारातून (mid day meal) विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

Mid day meal, Rajgurunagar
Filmy Style : भर दिवसा सात बायकांनी युवकाला पळवलं, मित्रांनी केला कारचा पाठलाग अन्...

हुतात्मा राजगुरु विद्यालयात दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार खाल्यानंतर विद्यार्थींना (students) पोटदुखी होऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज शिक्षकांना (teachers) आला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची (girls) आहे.

Mid day meal, Rajgurunagar
Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, माय-लेकासह युवक ठार

सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चांडोली रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थ्यांवर उपाचार करणारे काही वैद्यकीय अधिकारी हे दारुच्या नशेत असल्याचा आराेप पालकांनी साम टीव्हीकडे केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com