Pune: वीजबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात! (पहा Video)

शाळांचा वीज पुरवठा खंडित
Pune: वीजबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात! (पहा Video)
Pune: वीजबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात! (पहा Video)अश्विनी जाधव केदारी

अश्विनी जाधव केदारी

पुणे : दीड दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा आता काही प्रमाणात सुरु करण्यात येत होत्या. मात्र शाळा सुरू होताच आता नवं संकट समोर येऊन उभा आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Schools) तब्बल ८०० शाळांचा वीज पुरवठा Electricity Supply खंडित करण्यात आला आहे. वीजबिल Electricity Bill न भरल्यामुळे शाळांचा हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आकडेवारीनुसार, वीज बिल न भरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ७९२ शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या सर्वच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी २८४७ शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर इतर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

तब्बल १२८ शाळांचे मीटर काढले

वीज बिल न भरल्यामुळे ७९२ शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे तर १२८ शाळांचे मीटरचं वीज वितरणने msedcl काढून टाकले आहेत. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील ४३७ शाळांचा समावेश

यापैकी तब्बल ४३७ शाळा म्हणजे निम्म्याहून अधिक शाळा या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातल्या आहेत. भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्यातील सुमारे ४३७ शाळांचा यामध्ये समावेश आहेत.

Pune: वीजबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात! (पहा Video)
समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध? मलिकांच्या Screenshot ने खळबळ

अंधारात असलेल्या तालुक्यातील शाळा;

 1. इंदापूर- १९६

 2. शिरूर- १४६

 3. मुळशी- ५०

 4. भोर- ७४

 5. दौंड- ५२

 6. खेड- ४६

 7. वेल्हा- ३२

 8. आंबेगाव- ३४

 9. बारामती- ३५

 10. हवेली- १२

 11. जुन्नर- ४१

= एकूण 800

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com