खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31Saam Tv

मुंबई: महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जाताना दिसत आहे. त्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या देखील वाढत चाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ८१ पोलिसांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. यामुळे शहरात कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या १३१२ येऊन पोहोचली आहे.

हे देखील पहा-

आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या एकूण १२६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावेळी पुण्यात देखील शनिवारी ३१ पोलीस कर्मचारी (Pune Police) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या ४६५ झाली आहे. मुंबईमध्ये शनिवारी १०६६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यावेळी ११ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरामध्ये सध्या ७३५१८ सक्रिय रुग्ण आहेत.

खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31
Sangli: सहा जात पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्रामध्ये ४२ हजार ४६२ नवीन रुग्ण आढळले आणि २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने शनिवारी ही माहिती दिली आहे. राज्यामध्ये सध्या २,६४,४४१ सक्रिय रुग्ण आहेत. याबरोबरच राज्यामध्ये ओमायक्रॉनचे १२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमायक्रॉनची एकूण १७३० प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. नवीन प्रकरणाच्या तुलनेमध्ये येथे बरे होणाऱ्यांची संख्या निम्मी आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. पुण्यामध्ये शनिवारी ५ हजार ७०५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.