मुंबईत कोरोनाचा विस्फोट, आजची आकडेवारी चिंता वाढवणारी, BMC ने दिल्या 'या' सूचना

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.
Corona Patients in Mumbai
Corona Patients in MumbaiSaam TV

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने (corona new patients) पाचशेचा टप्पा पार केला होता. मात्र, आजच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा ८८९ वर पोहोचला आहे.

Corona Patients in Mumbai
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती : संजय राऊत

त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढता संसर्गाला अटकाव आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व चाचणी केंद्र आणि रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसभरात ८८९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची बाधीत रुग्णांची संख्या १०६७९७५ एवढी झाली आहे. दरम्यान, आज मुंबईत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना मृतांची संख्या १९५६८ वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण ४२९४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

Corona Patients in Mumbai
असं कुठं असतंय व्हय! ८ धावांवर अख्खा संघ गारद, दुसऱ्या ओव्हरमध्येच खेळ खल्लास!

मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील आठवड्यापासून मुंबईमध्ये कोविड-१९ चा संसर्ग वाढत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी आजार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली मुंबई महापालिकेची तयारी खालीलप्रमाणे.

१ ) मास्कचा वापर करण्यासह कोविड- १९ संबंधीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

२ ) चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

३ ) सर्व जंबो कोविड केंद्र,चाचणी केंद्र आणि खाजगी रुग्णालये सुसज्ज करण्यात येणार आहेत.

४ ) झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेची विशेष कामे हाती घेण्यात येणार आहेत.

५ ) कोविड-१९ आणि पावसाळी आजारांचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून पाच वेळा निर्जंतुकीकरण केले जाईल.

६ ) लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात येणार आहे. (विशेषत: किशोरवयीन वयोगटासाठी)

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com