Crime News: मित्रासोबत गार्डनमध्ये बसलेल्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; नवी मुंबई हादरली

Sexual Assault On a Minor Girl: पीडित विद्यार्थीनी ही १६ वर्षीय अल्पवयीन असल्याने या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nerul Police Station Navi Mumbai
Nerul Police Station Navi Mumbaiसिद्धेश म्हात्रे

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मित्रासोबत गार्डनमध्ये बसलेल्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील नेरुळमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित विद्यार्थीनी ही १६ वर्षीय अल्पवयीन असल्याने या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nerul Latest News)

Nerul Police Station Navi Mumbai
Mumbai Fire: वाकोला परिसरात इमारतीच्या १० व्या मजल्यावर आग; काहीजण अडकल्याची भीती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरुळच्या सेक्टर 22 (Nerul) येथील बालाजी मंदिरा समोरील मैदानात या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. सदर पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत रात्रीच्या वेळी गार्डनमध्ये बसली होती.

यावेळी तेथे आलेल्या एका तरुणाने पीडितेच्या मित्राला दमदाटी करुन पळवून लावले यानंतर त्यांने तरुणीवर बलात्कार (Sexual Assault) केला. या संतापजनक घटनेनंतर मुलीने आपलं घर गाठून सर्व हकीकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी मुलीवर प्राथमिक उपचार करुन नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Breaking Marathi News)

Nerul Police Station Navi Mumbai
Uddhav Thackeray In Morcha: महाराष्ट्राला लुटायला आलेले हे लफंगे आहेत; महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात पोस्को (Pocso) कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ४ दिवस उलटले तरी अद्याप बलात्कार करणारा आरोपी मोकाट असल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com