संतापजनक: ७० वर्षीय व्यक्तीने १० वर्षाच्या मुलीचा केला विनयभंग

मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यावर उघडकीस आला आहे.
संतापजनक: ७० वर्षीय व्यक्तीने १० वर्षाच्या मुलीचा केला विनयभंग
MolestationSaam tv

मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांनी (Police) १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ७० वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यावर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे देखील पाहा

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मुलीने संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच परिसरात राहतात, आरोपी मुलीला आपल्या घरी बोलवत असे आणि चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवून मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करत असे.

शुक्रवारी पीडित मुलगी मानसिक तणावत दिसली. त्यावेळी घरातल्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता. तिने हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जवळचे पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.