Bhimashankar News : भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या वादावरून देवस्थानच्या अध्यक्षांचा मोठा दावा

आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता चौफेर टीका होताना दिसत आहे.
Bhimashankar News
Bhimashankar NewsSaam Tv

Pune Bhimashankr News : आसाम सरकारने मंगळवारी एक जाहिरात जारी करून देशातील भीमाशंकर नावाचे सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे.

Bhimashankar News
Beed Accident : ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, 1 जागीच ठार; बीडच्या सोमठाना गावाजवळील घटना

यावर भिमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अँड सुरेश कौदरे यांनी शंकराचार्य यांच्या बारा ज्योतिर्लिंग श्लोक,शिवलिलामृत ग्रंथ,शिवपुराणाचे दाखला देत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही हीच भूमिका असल्याचे ठाम मत भिमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी मांडलं आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भिमाशंकर कडे पाहिले जातं. शेकडो वर्षाची परंपरा असलेले भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातले एकमेव ठिकाण असून या वादावर पुणे जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीनी नाराजी व्यक्त केली आहे

Bhimashankar News
Latur News: पहिल्या बाळंतपणामुळं उघड झाला धक्कादायक प्रकार; आई-वडील आणि पतीवर गुन्हा दाखल

आसाम सरकारच्या या दाव्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. यावर राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यामध्ये हस्तक्षेप करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com