Bharat Jodo Yatra: राहुल गांंधींना मोठा धक्का! सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ठाण्यात गुन्हा दाखल

Bharat Jodo Yatra Latest News: सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राहुल गांधींवर ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam TV

सुशांत सावंत, मुंबई

Rahul Gandhi Latest News: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. कॉंग्रेसचे खासदार आणि भारत जोडो यात्रेचं नेतृत्व करत असलेले राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राहुल गांधींवर ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Bharat Jodo Yatra Latest News)

Rahul Gandhi
सावरकरांवरील आक्षेपार्ह विधान राहुल गांधींना भोवणार? सावरकरांचे नातू तक्रार दाखल करणार

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Sawarkar) यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप करत राहुल गांधींवरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल, १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला होता. पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही आज मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Mumbai : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! गोवरने घेतला ८ वा बळी; संशयित रुग्णांची संख्या संख्या २,६२३ वर

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे." असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com