"पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय काळाच्या पडद्याआड" - अजित पवार

"एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." असं म्हणत उप-मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
"पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय काळाच्या पडद्याआड" - अजित पवार
"पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय काळाच्या पडद्याआड" - अजित पवारSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. "पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड" असं म्हणत राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ("A chapter closed becouse death of Padma Vibhushan Babasaheb" Ajit Pawar tributs to babasaheb purandare)

हे देखील पहा -

उप-मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com