Pune: भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील बालकाचा मृत्यू

भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील २ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे.
Pune: भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील बालकाचा मृत्यू
Pune: भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील बालकाचा मृत्यूSaam Tv

पुणे : भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील २ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे- नगर रस्त्यावर घडली आहे. श्रेयस युवराज कोकणे असे बालकाचे नाव आहे. अपघातामध्ये दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा तसेच त्याचा मित्र विवेक सूर्यवंशी (रा. लोणीकंद) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा त्याचा मामाचा मुलगा श्रेयस, मित्र विवेक सूर्यवंशी नगर रस्त्यावरून निघाले होते. वाघोली जवळ भरधाव जीपने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि सहप्रवासी सूर्यवंशी यांच्या मध्ये बसलेला श्रेयस दुचाकीवरून धडक बसल्यावर दूरवर फेकले गेले आहे.

Pune: भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील बालकाचा मृत्यू
ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

गंभीर जखमी झालेल्या श्रेयसचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा, त्याचा मित्र सूर्यवंशी जखमी झाला, असून पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com