Crime News : बीएमसी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकास लुटले; खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

खार पोलिसांनी मुंब्रा येथून आरोपीस घेतले ताब्यात
Crime News
Crime NewsSaam Tv

संजय गडदे

Mumbai Crime News : दागिने घरी ठेवले तर घरफोड्या होतात आणि घालून रस्त्यावर फिरणे तर फारच धोकादायक ठरत आहे. घराबाहेर पडताना विशेषतः महिला आणि वृद्धांनी आपल्या दागिन्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईच्या खार पोलिसांनी नुकतीच अली झहुर जाफरी (37 वर्ष) या तोतया बीएमसी कर्मचाऱ्याला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा येथून अटक केली. अली झहर याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह 19पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

Crime News
Police Bharati: हायटेक कॉपीनंतर आता उत्तेजीत करणाऱ्या औषधांचं सेवन?; पोलीस भरती प्रक्रियेतला धक्कादायक प्रकार उघडकीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पश्चिमेकडील 20 वया रस्त्यावरील किरण सोसायटी जवळून जाणाऱ्या पन्नास वर्षे व्यक्तीला थांबवून बीएमसी अधिकारी असल्याचे भासवून पुढे नाकाबंदी चालू असून तुमच्या जवळचे दागिने कडून ठेवा असे सांगितले.

सद्या चोरीचे प्रमाण वाढले असून तुमचे सोने पिशवीत काढून ठेवा असे सांगून फिर्यादी यांच्या जवळील सोन्याची चेन व दोन अंगठ्या असा ऐवज एका पेपर मध्ये गुंडाळून तो पेपर फिर्यादी यांच्या बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी तक्रारी दिली यावरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Delhi Kanjhawala Case: निर्दयीपणाचा कळस! दिल्ली प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी 'या' गोष्टी केल्या कबूल

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने व पोलीस निरीक्षक (गुन्हे)संदिप पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश नडविनकेरी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याचा पाठपुरावा करून सीसीटिव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपीने खार ते बांद्रा, बांद्रा ते कुर्ला, कुर्ला ते ऐरोली हायवे असे 4 ते 5 वेळा रिक्षा बदलली असल्याची दिसून आले.

जवळजवळ 40 ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज पाहून तसेच गुप्त माहितीदार यांचे मदतीने अज्ञात आरोपी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा काऊसा येथे राहत असल्याचे समजताच मुंब्रा पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीने धाप लागल्याचा बनाव करून बेशुद्ध झालेचे नाटक करून जमिनीवर अंग टाकून दिले. पोलिसांनी शिताफीने त्यास गाडीत टाकून त्याची वैद्यकीय तपासणी करून खार पोलीस स्टेशन आणण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com