Pune : उद्यापासून जमावबंदी नाही, कोरोनाचे नियम जैसे थे...

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन, कोरोनाचा प्रसार होऊ नये
Pune : उद्यापासून जमावबंदी नाही, कोरोनाचे नियम जैसे थे...
Pune : उद्यापासून जमावबंदी नाही, कोरोनाचे नियम जैसे थे... Saam Tv

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन, कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी पुण्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात येणार होती अशी सकाळी माहिती मिळाली होती. परंतु पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर २०२१ पासून संपूर्ण पुण्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्याकरिता संपूर्ण शहरात ७ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

हे देखील पहा-

या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे. पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवाकरिता या अगोदर आचारसंहिता लागू करण्यात आली होती. यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका यावेळेस देखील निघणार नाहीत.

Pune : उद्यापासून जमावबंदी नाही, कोरोनाचे नियम जैसे थे...
दगडफेकीनंतर दारव्हात जमावबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता

गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे ७ हजार पोलीस कर्मचारी, ७०० अधिकारी, शीघ्र कृतीदल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश यामध्ये असणार आहे. गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत याकरिता वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहेत. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com