ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचे नुकसान

बाळकुम, दुर्गा अंकुर इमारतीजवळ, अशोक नगर, दादलानी पार्क या ठिकाणी भंगार मालाच्या गोडाऊनला भीषण आग लागली
ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचे नुकसान
ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचे नुकसान Saam Tv

ठाणे : बाळकुम, दुर्गा अंकुर इमारतीजवळ, अशोक नगर, दादलानी पार्क या ठिकाणी भंगार मालाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत पुठ्ठ्यांचे खोके मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या आगीवर ४५ मिनिटांत नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे.

हे देखील पहा-

बाळकुम ठिकाणी प्रमोद मढवी यांचे भंगार मालाचे गोडाऊन आहे. यामध्ये पुठ्ठ्याचे खोके ठेवण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी आग लागल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली होती. तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते.

ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचे नुकसान
प्रवचन सेवा देताना संगणा बसव स्वामी महाराजांचे निधन

पुठ्ठयांचे खोके असल्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुरच धूर पसरला होता. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच यावेळी, एक फायर वाहन, एक पाण्याचा टँकर तसेच जम्बो पाण्याचा टँकरला पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com