Mumbai: मोबाईलमध्ये गाणी ऐकण्याच्या वादातून अनर्थ! मित्रानेच केली मित्राची हत्या

Mumbai Crime: आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत.
Mumbai: मोबाईलमध्ये गाणी ऐकण्याच्या वादातून अनर्थ! मित्रानेच केली मित्राची हत्या
Nagpada- Mumbai Murder CaseSaam Tv

मुंबई: मोबाइल देत नसल्याच्या रागातून नागपाडामध्ये वार्ड बाँयची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सन्मान सुधीर सावंत असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी (Nagpada Police, Mumbai) दिलीपकुमार हरिकिशन राम (२४) याला अटक केली आहे. आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत. (A friend killed his friend over an argument over listening to songs on a mobile phone)

हे देखील पहा -

दोघंही एकत्र फिरत असताना आरोपींचा गाणे (Songs) ऐकण्यासाठी घेतलेला मोबाइल (Mobile) देत नसल्याचा राग अनावर झाल्याने दोघांमध्ये गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर भांडणं झाली. त्यावेळी आरोपी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिला. त्यावेळी सन्मान हा गाड्यांमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. हे पाहून आरोपीने पळ काढला या प्रकरणी नागपाडा पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com