बेल्हे-जेजुरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपाला भरधाव टेम्पोने चिरडले

अनेक दिवसापासून हा महामार्ग अपघाताचा सापळा बनला असून धोकादायक वळणांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
Sheep Accident
Sheep AccidentSaam TV

पुणे : शिरूर (Shirur) तालुक्यातील चांडोह येथे आबा शिंदे हा मेंढपाळ मेंढ्याचा कळप बेल्हे जेजुरी महामार्गावरुन घेऊन जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने १५ मेंढ्यांना चिरडलं आहे. या अपघातात मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून स्थानिक डॉक्टरांकडून मेंढ्यांवर (sheep) प्राथमिक उपचार करण्यात आलेत.

मात्र, या अपघाचतात (Accident) मेंढपाळाचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. गेली अनेक दिवसापासून हा महामार्ग अपघाताचा सापळा बनला असून धोकादायक वळणांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून प्रशासनाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

मागील आठ महिन्यांपासून मेंढ्यांना चारा उपलब्ध होत नसतानाही तळपत्या उन्हात गावागावांसह डोंगर माळरानावर चाऱ्याचा शोध घेत मेंढपाळ आबा शिंदेनी पोटच्या लेकराप्रमाणे मेंढ्यांचा सांभाळ केला. उन्हाच्या चटक्यात मेंढ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागला यावेळी डॉक्टरांना मदतीने मेंढ्यावर उपचार करुन जगवल्याही, मात्र आता अपघात झाल्याने मेंढ्यांना चालता येत नाही. त्यामुळे एका जागेवर बसलेल्या या मेंढ्यांना चारा कोठून उपलब्ध करायचा असा गंभीर प्रश्न मेंढपाळ आबा शिंदे यांना पडला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com