मिरा रोड मधिल कानकीया परिरासत मधिल इमारतीला भीषण आग

आगीमुळे शेजारी असलेल्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

मुंबई - मीरा रोड मधिल कानकीया परिसरातील लक्ष्मी नगर परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लक्ष्मी नगर मधिल वासुदेव स्काय हाय या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. या मध्ये रूम क्रमांक 101 पूर्णता जळून खाक झाली आहे. आगीची तीव्रता इतकी होती की आगीमुळे शेजारी असलेल्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे देखील पाहा -

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंतरण मिळविण्यात यश आले आहे. जवळपास 50 अग्निशमन जलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

Mumbai News
Parenting Tips : वाढत्या वयानुसार मुलांना द्या असा आहार !

जवळपास 250 लोकं या इमारतीत राहत होते,अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना वेळेत इमारतीच्या बाहेर कडून आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किट मुळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत येत आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com