हेदुटणे गावाजवळ भलामोठा होर्डिंग कोसळला; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...

हेदुटणे गावाजवळ भलंमोठं होर्डिंग थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीवर पडला आहे. यात एमआयडीसीची जलवाहिनी देखील फुटण्यापासून वाचली आहे.
हेदुटणे गावाजवळ भलामोठा होर्डिंग कोसळला; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...
हेदुटणे गावाजवळ भलामोठा होर्डिंग कोसळला; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...प्रदीप भणगे

डोंबिवली:  गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या वेळेत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे डोंबिवली आणि परिसरात वाऱ्यांमुळे अनेक झाडं उन्मळून पडली. तसेच बदलापूर पाईपलाईन या रोडवर एक भला मोठा जाहिरातीचा फलक (होर्डिंग) थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीवर पडला आहे. मात्र ही घटना घडून देखील एमआयडीसीच्या अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (A large hoarding collapsed near the village of Hedutane; But the administration ignored)

हे देखील पहा -

कल्याण-डोंबिवलीसह परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कल्याण डोंबिवली सह ग्रामीण भागातील जनतेला दोन दिवस अंधारात ठेवले होते. तसेच वादळ वाऱ्यामध्ये झाडे महावितरणच्या तारांवर पडून तुटण्याच्या घटना घडल्या होत्या. तर काही महिन्यांपूर्वी आलेल्या वादळात कल्याण शिळ रोडवर सुमारे 4 होर्डिंग पडले होते. यात 2 जण जखमी सुद्धा झाले. आता बदलापूर पाईपलाईन महामार्गाच्या कडेला असलेल्या होर्डिंग्सचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. हेदुटणे गावाजवळ भलंमोठं होर्डिंग थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीवर पडला आहे. यात एमआयडीसीची जलवाहिनी देखील फुटण्यापासून वाचली आहे.

हेदुटणे गावाजवळ भलामोठा होर्डिंग कोसळला; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष...
एखादा पेंग्विन कमी पाळा पण रस्त्यांवरील खड्डे भरा - नितेश राणेंच महापौरांना पत्र

मात्र ही घटना घडून देखील एमआयडीसीच्या अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच  महामार्गाच्या कडेला असलेल्या होर्डिंग्सना शासनाच्या परवानग्या आहेत का ? असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.